अलिबाग : अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता वैद्यकीय क्षेत्रातील विविध विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. दिल्ली येथील डीएन बोर्डाने या अभ्यासक्रमाच्या २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी १९ जागांच्या प्रवेशासाठी मंजुरी दिली आहे. वैद्यकीय नीट परीक्षा दिलेल्या पात्र उमेदवारांना पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण घेण्यासाठी येथे प्रवेश घेता येणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील यांनी दिली. जिल्ह्यासाठी ही एक आनंदाची बाब आहे.
Comments are closed