शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अलिबाग – रायगड
बांधकाम स्थळास अधिकाऱ्यांची पाहणी
दिनांक १५ जानेवारी २०२६ ला मा.श्री. धीरज कुमार (भाप्रसे) , सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग महाराष्ट्र शासन, मा. श्री. अनिल भंडारी (भाप्रसे) आयुक्त वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अलिबाग - रायगड तसेच उसर ता. अलिबाग येथे सुरु नव्याने सुरू असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच इतर इमारतीच्या बांधकाम स्थळी भेट दिली.
या भेटीदरम्यान मा.सचिव तसेच आयुक्त सर यांनी महाविद्यालयाच्या तसेच रुग्णालयाच्या सद्यस्थिती बद्दल सादर करण्यात आलेली PPT तसेच बांधकामस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या कल्याणासंबंधी करण्यात येणाऱ्या सुविधा, शैक्षणिक वातावरण, मनुष्यबळ आणि इतर आवश्यक बाबींविषयीही त्यांनी सविस्तर विचारपूस केली. या भेटीदरम्यान झालेली चर्चा सकारात्मक झाली असून प्रकल्पाची गती, गुणवत्ता आणि पुढील नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.















