३०० कोटी वृक्षारोपण मोहीम
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग
महाराष्ट्र शासनाच्या ३०० कोटी वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत दिनांक ३१/०७/२०२६ रोजी दत्त टेकडी, अलिबाग येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
पावसाळी वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग या संस्थेस प्राप्त झालेले एकूण १००० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले.
📅 दिनांक
३१/०७/२०२६
📍 स्थळ
दत्त टेकडी, अलिबाग
🌱 उद्दिष्ट
१००० वृक्ष लागवड पूर्ण
या कार्यक्रमास मा. अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील तसेच संस्थेतील विद्यार्थी, अध्यापक वर्ग, अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पर्यावरण संवर्धनाचा दृढ संकल्प व्यक्त केला.
