विधी साक्षरता कार्यक्रम उत्साहात संपन्न

विधी साक्षरता कार्यक्रम उत्साहात संपन्न

मुंबई : रायगड-अलिबाग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रायगड-अलिबागव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने विधी साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रायगड-अलिबाग येथे करण्यात आले.


सदर कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थी, अधिकारी-कर्मचारी तसेच उपस्थितांना विविध कायदे, नागरिकांचे अधिकार व कायदेशीर तरतुदी याबाबत मार्गदर्शन करून कायदेविषयक जनजागृती व विधी साक्षरता वाढविणे हा होता.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पूर्वी पाटील, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रायगड-अलिबाग होत्या. अध्यक्षीय भाषणातून त्यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक ज्ञानासोबतच कायदेविषयक मूलभूत माहिती आत्मसात करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. कायद्याबाबत जागरूक नागरिक घडविण्यासाठी अशा विधी साक्षरता कार्यक्रमांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.


कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्रीमती रेवती म. कंठे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग यांची उपस्थिती लाभली.

यावेळी अॅड. के. डी. पाटील, ज्येष्ठ पॅनल वकील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग यांनी Anti Ragging Laws, Traffic Rules तसेच NALSA (Legal Services to Persons with Mental Illness and Persons with Intellectual Disabilities) Scheme, 2024 या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.


विद्यार्थ्यांनी कायद्याचे ज्ञान आत्मसात करून त्याचा योग्य वापर करावा, तसेच रॅगिंगसारख्या गैरप्रकारांपासून दूर राहावे, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.तसेच अॅड. विक्रांत पाटील, पॅनल वकील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग यांनी International Youth Day, Drug Abuse and Drug Addiction निर्मूलन तसेच “NALSA (Drug Awareness and Wellness Navigation – For a Drug Free India) Scheme, 2025” याबाबत उपस्थितांना माहिती दिली. व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम, त्यापासून बचाव आणि पुनर्वसनाच्या उपाययोजनांबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.