रायगड — उसर (ता. अलिबाग) येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बांधकाम स्थळी भेट
- मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन — श्री. राजेश अग्रवाल (भाप्रसे)
- मा. जिल्हाधिकारी, रायगड — श्री. किसन जावळे (भाप्रसे)
- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड — श्रीमती नेहा भोसले (भाप्रसे)
दिनांक 29 नोव्हेंबर 2025 ला मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन श्री. राजेश अग्रवाल(भाप्रसे), मा. जिल्हाधिकारी रायगड श्री. किसन जावळे (भाप्रसे) तसेच मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड श्रीमती नेहा भोसले (भाप्रसे) यांनी उसर ता. अलिबाग येथे सुरु असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच इतर इमारतीच्या बांधकाम स्थळी भेट दिली.
या भेटीदरम्यान मा. मुख्य सचिव सर यांनी महाविद्यालयाच्या साइट प्लॅनसंबंधी सादर करण्यात आलेली PPT तसेच बांधकामस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या कल्याणासंबंधी करण्यात येणाऱ्या सुविधा, शैक्षणिक वातावरण आणि इतर आवश्यक बाबींविषयीही त्यांनी सविस्तर विचारपूस केली.
भेटीदरम्यान झालेली चर्चा सकारात्मक झाली असून प्रकल्पाची गती, गुणवत्ता आणि पुढील नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.




